breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ता टिळक यांच्या मुलाला भाजपकडून मोठी संधी

पोटनिवडणुकीसाठी टिळक घरातच हे तिकीट दिलं जाईल का?

पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. यासाठी सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपचा अद्याप उमेदवार ठरतोय तोपर्यंतच भाजपने मुक्ता टिळकांचा चिरंजीव कुणाल टिळक याला मोठी संधी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्याच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यामधून मुक्ता टिळकांचे चिरंजीव कुणाल टिळक यांचं देखील नावाचा समावेश आहे.

कुणाल टिळक हे गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपचं काम करत आहेत. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुणाल टिळक यांना पोटनिवडणुकीमध्ये संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून हे तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही पोट निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या इतर नेत्यांमध्ये देखील रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे.

कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते पदाची संधी दिल्याने पोटनिवडणुकीसाठी टिळक घरातच हे तिकीट दिलं जाईल का? इतर कोणा नेत्याला संधी भाजपकडून दिली जाईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, मी देखील या निवडणुकी करीता इच्छुक आहे. त्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल की, कोणाला उमेदवारी देण्यात येईल.? पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि बिनविरोधच होऊ शकते, असं वक्तव्य दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button