राज्यातील ‘या’ विभागात ‘या’ दिवशी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार
पुणे | दोन दिवसांपासून अवकाळीने पावसाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणामध्ये देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उष्णतेपासून काही अंशी दिलासा मिळत आहे. अशातच आता राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये, सहा ते आठ तारखेला कोकण, गोवा आणि मराठवाड्यात, सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील आदिनाथ क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत
पुण्यात ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पुढील पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ राहणार आहे. तर सात आणि आठ तारखेला आकाशात ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.