breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

भारतात मुकेश अंबानीच आणताय असा प्लॅटफॉर्म की…

Satellite internet in India : भारतात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने अनेक बदल घडवून आणले आहे. मोबाइल फोन घराघरात पोहचण्यासाठी ते स्वस्तात आणले गेले आहे. इनकमिंग कॉलिंग मोफत केली. त्यानंतर मोबाइलच्या जगात नवीन क्रांती आणण्याचा मान आता मुकेश अंबानी यांनाच मिळाला आहे. भारतात सॅटेलाईन इंटरनेट सुरु करण्याच्या स्पर्धेत मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. त्यासाठी अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्कची स्टारलिंक स्पर्धेत होती.

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्याकडे जिओ कंपनीची जबाबदारी आहे. आता जिओ प्लॅटफॉर्म आणि झक्जमबर्गचे एसईएस या जॉइंट व्हेंचर्सला गीगाबाइट फायबर इंटरनेटसाठी मंजुरी मिळाली आहे. उपग्रहाद्वार वेगवान इंटरनेट सेवा देण्याचे काम हे प्लॅटफॉर्म करणार आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने यासाठी जिओ अन् एसईएसला मंजुरी दिली आहे. तसेच आता दूरसंचार विभागाकडून काही मान्यता या कंपनीला घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच देशात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, उपग्रह कनेक्शनसंदर्भात इंटरनेसट सेवेसाठी तीन मान्यता मिळाल्या आहेत. त्याचा उद्देश उपग्रहाद्वारे वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. या स्पर्धेत अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंकसुद्ध होती. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.

आणखी एक कंपनी इनमारसॅटला हायस्पीड सॅटेलाइटवर आधारित इंटरनेट सेवा देण्याच्या स्पर्धेत होती. तिलाही भारतात उपग्रह चालवण्याची मान्यता मिळाली आहे. तसेच एलोन मस्कच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉन डॉट कॉमच्या कुइपरसह अन्य दोन कंपन्यांनीही त्यासाठी अर्ज केले आहेत. युटेलसॅटच्या भारती एंटरप्रायझेसच्या वनबेबला गेल्या वर्षीच्या अखेरीस सर्व मान्यता देण्यात आल्या.

कंसल्टेंसी फर्म डेलॉयटनुसार, भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हीस मार्केटमध्ये गेल्या पाच वर्षांत 36% वाढ दाखवली आहे. वर्ष 2030 पर्यंत हा उद्योग 1.9 अब्ज डॉलरवर जाणार आहे. जगभरात आता उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देण्याचे तंत्रज्ञान वाढत आहे. या तंत्रज्ञानात अमेझनकडून मोठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button