माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्या. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी हा स्फोट मात्र भीषण होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेत गोडाऊनचे संपूर्णपणे नुकसान झाले असून या गोडाउनमध्ये अवैधरित्या सिलेंडर ठेवले असल्याची माहिती या घटनेनंतर समोर आली आहे. दरम्यान गोडाऊनच्या जवळच असलेल्या अनेक गाड्यांचे देखील या स्फोटामुळे नुकसान झाले आहे.