breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘लासलगाव’च्या 9 कांदा व्यापाऱ्यांवर ‘इन्कम टॅक्स’चे छापे

लासलगाव: आयकर विभागाने लासलगाव परिसरातल्या 9 कांदा व्यापाऱ्यावर बुधवारी छापे घातले आहेत. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली आहे. व्यापाऱ्यांची कार्यालये, गोडावून, कागदपत्र यांची कसून तपासणी केली जात आहे. निर्यात बंदी करून देखील कांद्याचे भाव आटोक्यात येत नसल्याने केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 1998 पासून आजपर्यंत 22 वर्षात 17 वेळा कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

बडे व्यापारी कांद्यांचा साठा करून भावांमध्ये चढउतार निर्माण करतात असा आरोप केला जातो. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही तर फक्त दलालांची चांदी होते असाही आरोप केला जात आहे. कांदयाचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याविरुद्ध टीकाही झालेली होती. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button