Health Tips : उन्हाळ्याच्या तडाख्यात काकडी फायदेशीर!

Health Tips : काकडीमध्ये पाण्यासोबतच कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशिअम, पोटॅशियमसारखी पोषक द्रव्यांसह व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय मधुमेहासाठीही काकडी खाणे चांगले असते, त्यामुळे या काळात काकडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

मधुमेहासह रक्तातील साखर कमी करण्यासाठी काकडी मदत करते. याशिवाय काकडीत पोटॅशियम, मॅग्नेशिअम असल्याने ती हृदय रुग्णासाठीही लाभदायक आहे. पोट साफ राहते.
हेही वाचा – Pune : पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा एस. एस. गडकरी पुरस्कार
लग्नसमारंभासह अन्य ठिकाणी कोशिंबीर, फ्रूट सलाडसाठी काकडीचा वापर होतो. याशिवाय थंड असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही काकडी खाण्याचा सल्ला देतात.

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत काकड्यांची आवक मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पण सध्या आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही काकडीची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा घटल्याने भावात वाढ झाली आहे.