breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Motorola चा नवीन बजेट स्मार्टफोन Moto E7 Plus आज लाँच होणार

नवी दिल्ली – Motorola चा नवीन बजेट स्मार्टफोन Moto E7 Plus आज लाँच होणार होता. परंतु, कंपनी ही लाँचिंग पुढे ढकलली आहे. परंतु, या दरम्यान फोनचे वैशिष्ट्ये, फीचर्स आणि किंमतीची माहिती उघड झाली आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये कंपनीने काय-काय दिले आहे, जाणून घ्या. मोटोच्या या नवीन फोनमध्ये 1600×720 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिजाइनचा आहे. फोनची किंमत १४९ यूरो म्हणजेच १३ हजार रुपये आहे.

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
विनफ्यूचरच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.

४८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वेयर मॉड्यूल ड्यूल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

5000mAh ची बॅटरी
फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. परंतु, या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला नाही. हा फोन १० वॉटच्या चार्जरसोबत येतो. फोनला चार्ज करण्यासाठी यात मायक्रो यूएसबी पोर्ट दिला आहे. ऑडियो जॅक सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अँड्रॉयड १० आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड मोटोरोलाच्या My UX इंटरफेस आणि मोटो अॅक्शन्स सोबत येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button