TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

करोनाकाळात भारतीय स्टेट बँकेची सर्वाधिक फसवणूक

नागपूर : देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८० हजार ८६५.३४ कोटींच्या फसवणुकीची २२ हजार ७२२ प्रकरणे घडली. त्यापैकी सर्वाधिक ६ हजार ९३९ प्रकरणे २०२० या करोना काळातील असल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

स्टेट बँकेतील देशभरातील शाखांत  २०१७ मध्ये २ हजार ३२४.३७ कोटींच्या फसवणुकींची १ हजार ३०२ प्रकरणे घडली. २०१८ मध्ये ८ हजार ७६४.७७ कोटींच्या फसवणुकींची २ हजार ५९१ प्रकरणे, २०१९ मध्ये ३४ हजार ६२८ कोटींच्या फसवणुकींची ५ हजार ४८८ प्रकरणे, २०२० मध्ये २३ हजार ७७३.६४ कोटींची ६ हजार ९३९ प्रकरणे, २०२१ मध्ये ६ हजार १३२.३० कोटींच्या फसवणूकींची ४ हजार १०९ प्रकरणे, तर १ जानेवारी २०२२ ते सप्टेंबर- २०२२ पर्यंत ५ हजार २४१.९३ कोटींच्या फसवणुकीची २ हजार २९३ प्रकरणे घडली. २०१७ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान स्टेट बँकेच्या सगळय़ाच शाखेत १२९.७६ कोटींच्या सायबर फसवणुकींची १७ हजार प्रकरणे घडली आहेत.

६१० कर्मचाऱ्यांचा सहभाग..

स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत २०१७ ते सप्टेंबर २०२२ या काळात ६३४.४१ कोटींच्या फसवणूक प्रकरणांमध्ये ६१० कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचाही धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून पुढे आला आहे. सर्वाधिक १७५ कर्मचाऱ्यांचा सहभाग २०१८ मध्ये होता.

स्टेट बँकेच्या संबंधित विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ही माहिती उपलब्ध केली गेली. बँकेतील विविध जबाबदारी असलेल्या विभागांकडून या प्रकरणांवर कायदेशीर व इतर कारवाई केली जाते. फसवणुकींच्या काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला, या दोषी कर्मचाऱ्यांवर बँकेच्या दक्षता विभागाकडून कारवाई केली जात असून त्याची माहिती आमच्या विभागाकडे नसते.

– ईश्वर चंद्र शाहू, उपमहाव्यवस्थापक व केंद्रीय माहिती अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button