ताज्या घडामोडी

रुपीनगर, तळवडे, सहयोगनगर मधील नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न; शिवसेना भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब नरळे यांच्या वतीने आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा विचारानी प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणावर रुपीनगर, तळवडे, सहयोगनगर मधील नागरिकांसाठी भव्य असे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब सुखदेव (आप्पा) नरळे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाची सुरूवात पूजनाने झाली. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, पिंपरी चिंचवड युवासेना शहर प्रमुख चेतन पवार, उप जिल्हाप्रमुख रोमी सिंधू, उप जिल्हाप्रमुख निलेश मुटके, शहर संघटक संतोष सौंदणकर, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, पिंपरी चिंचवड प्रभारी अशोक वाळके, विधानसभा महिला संघटिका कल्पना शेटे, संघटक रावसाहेब थोरात, शहर संघटक प्रवीण राजपूत, समन्वयक राजेंद्र राठोड, समन्वयक सुजाताताई काटे, युवासेना चिटणीस सुनील सामगीर, युवा अधिकारी अमित शिंदे, विभाग प्रमुख नितीन भोंडे, उपविभाग प्रमुख पांडुरंग कदम, अशोक जाधव, नागेश अजुरे, गणेश भिंगारे, प्रवीण पाटील, शाखा प्रमुख अभिमन्यू सोनसळे, सतीश कंठाळे, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण, मोहन जाधव, सुजित साळवी, सुनिल भाटे, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे उपशाखाप्रमुख भरत पाटील, बाळासाहेब वरे, कैलास तोडकर, जालिंदर घायाळ, ज्ञानेश्वर उत्तेकर, समीर हरपळे, सुभाष कोल्हे, सखाराम हलगुरे, सुनिल बधे, आनंद हिंगे, हरिभाऊ लोहकरे, अनंत सोबती, सुखदेव देवकर, तुकाराम जाधव, रमेश भालेकर, बाबासाहेब काळोखे, आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश क्षीरसागर, सुखदेव नरळे, भोसरी विधानसभा संघटक लिंबाजी जाधव, दीपक पाटील, सचिव काटोळे तसेच वंचित आघाडीचे वार्ड शंका अध्यक्ष बळीराम भोले, उपाध्यक्ष चंदन गायकवाड, महासचिव कुमार गावंडे, खजिनदार विक्रम साळवे व घारजाई माता ज्येष्ठ नागरीक आदी सर्व जण उपस्तित होते.

या शिबीरामध्ये नागरिकांनसाठी विविध प्रकारच्या तपासण्याचे आयोजन केले होते. यामध्ये नेत्र चिकित्सा केली गेली व ज्या नागरिकांना चष्मा लागला आहे त्यांना अल्प दारात चष्मा वाटप करण्यात आले व ज्यांना डोळ्याला प्रॉब्लेम आहे त्यांची शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ७० ते ८० जणांचे मोफत डोळ्याचे ओप्रेशन करण्यात येणार आहे. तसेच या मध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील करण्यात आले. शरीरामधील विविध आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक थेरपी देखील देण्यात आली. अशा विविध प्रकारच्या आजारांवर विविध प्रकारे उपचार पद्धती करण्यात आले.

 

या शिबिरास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे २५०० नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सदाशिव पडळकर, नामदेव नरळे यांनी केले. यासर्व कार्यक्रमाचे आयोजन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब सुखदेव (आप्पा) नरळे यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button