breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘जिथे प्रभू श्रीराम, तिथे हनुमान’ आदिपुरूषचा शो सुरू असताना वानराची एन्ट्री

Adipurush : बहुप्रतीक्षित आदिपुरूष चित्रपट अखेरीस आज (१६ जून) रोजी प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाचे तोंडभरून कौतुक होत आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबतच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आदिपुरूष सिनेमाच्या स्किनिंगदरम्यान एका थिएटरमध्ये वानर आल्याचा हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. वानर थिएटरमधील वरच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेतून आतमध्ये आला. चित्रपट पाहत असलेल्या प्रेक्षकांचं त्या माकडाकडे लक्ष गेलं. त्यानंतर चित्रपटगृहात एकच गोंधळ उडाला. प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. इतकंच नव्हे तर जय हनुमान अशा घोषणा प्रेक्षकांनी दिल्या.

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! चोरट्याने चक्क PMP बस पळवली

https://twitter.com/Legend_PSPK/status/1669545325957357568

आदिपुरूष हा सिनेमा तब्बल ५०० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई या चित्रपटाने केली आहे. हा सिनेमा तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button