breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

ऐकावं ते नवलंच! चोरट्याने चक्क PMP बस पळवली

पुणे : बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क पीएमपी बस पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती.

बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने पीएमपी बस पळवून नेली आणि मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाला. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – ‘अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन’; सुप्रिया सुळेंची स्तुतीसुमनं

पसार झालेल्या चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी (१४ जून) लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले. चोरट्यांनी या भागातील दोन बसच्या काचाही फोडल्याचे आढळून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button