ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मोदीजी की गॅरंटी : पिंपरी ते निगडी मेट्रोचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

शंकर जगताप यांचा विश्वास

पिंपरी: गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांची मागणी असलेल्या पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज झाले. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत देशातील जनता मोदीजींवर विश्वास दाखवून ४०० जागांचा आकडा भाजपा पार करेल, पुन्हा तिस-यांदा मोदीजी पंतप्रधान पदी विराजमान होवून, या पिंपरी ते निगडी मेट्रोचे उदघाटन करतील, असा विश्वास भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोलकाता येथून पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून हे भूमिपूजन केले. पीसीएमसी मेट्रोस्थानकावर हा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 6) संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यातील सहा मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यासह पिंपरी येथे पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. एस्प्लानेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 हजार 400 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
आरआरटीएस मुरादनगर उत्तर प्रदेश, मजेरहाट मेट्रो पश्चिम बंगाल, पुणे मेट्रो रुबी हॉल क्लिनिक महाराष्ट्र, पुणे मेट्रो रामवाडी महाराष्ट्र, पुणे मेट्रो पीसीएमसी मेट्रो स्टेशन महाराष्ट्र, आगरा मेट्रो उत्तर प्रदेश, कवी सुभाष मेट्रो पश्चिम बंगाल येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील सर्वात पहिली मेट्रो पिंपरी ते शिवाजीनगर या मार्गावर धावली. या मार्गाचे भूमीपूजन कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटनही झाले. आज या मार्गावर मेट्रो धावत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीचा ताण कमी होण्यास या मेट्रो मार्गामुळे मदत झाली आहे. आता पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते झाले आहे. लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ४०० हून अधिक खासदार निवडून येतील आणि नरेंद्रजी मोदी हे बहुमताने आपल्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. त्यानंतर पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याच हस्ते होईल, असेही जगताप म्हणाले.

पिंपरी ते निगडी मेट्रो कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, माजी महापौर योगेश बहल, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, भाजपा प्रवक्ता तथा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, उपाध्यक्ष रवी देशपांडे, आशा काळे, चिटणीस सचिन काळभोर, विजय शिनकर, देवदत्त लांडे, दत्ता झुळुक, विस्तारक नंदू कदम, कैलास सानप, देवदत्त लांडे, दत्तात्रय यादव, प्रदीप बेंद्रे तसेच भाजपाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, पुणे मेट्रोचे अधिकारी वर्ग, महापालिका अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामेट्रो कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. या मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन आणि दोन्ही टप्प्यातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे देखील उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले.

निगडी पर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली. पिंपरी ते निगडी दरम्यान 4.4 किलोमीटर अंतरावर चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पुणे शहरात रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button