breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

कुणाल आयकॉन येथील रस्त्याचा अद्ययावत पध्दतीने विकास

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पाठपुरावा; महापालिका संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक

पिंपरी: प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रस्त्याचे अद्ययावत पध्दतीने विकास करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामासाठी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पाठपुरावा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना काटे यांनी दिल्या आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास परिसरातील सोसायटीधारकांना त्याचा फायदा होणार आहे.

या संदर्भात २८ जुलै रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि संबंधीत पालिका स्थापत्य प्रकल्प अधिकारी, आर्किटेक्ट व कन्सलटंन्ट यांच्या सोबत बैठक पार पडली. सदर बैठकीत नियोजित आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीवेळी स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपनीचे सल्लागार लक्ष्मीकांत पतंगे, रणजीत कोल्हे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी या कामाच्या निविदा त्वरित काढाव्यात आणि काम सुरू करावे, अशा सूचनाही संबंधित विभाग प्रमुख आर्किटेक्ट आणि कन्सलटंन्ट यांना दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता हा विविध खोदकामामुळे खूप खराब झाला. या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून रस्ता खिळखिळीत झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. महापालिकेतर्फे या रस्त्याची वारंवार तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली जाते. परंतु, पुन्हा काही कामासाठी रस्ता खोदला जातो. रस्त्याची परिस्तिथी जैसे थे होते, संपूर्ण पिंपळे सौदागर मधील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले असून हा रस्ता शासकीय निविदेत अडकला आहे. कुणाल आयकॉन रस्ता खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या, शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे, पावसाळा काही दिवसांवर आला असून शाळा देखील चालू होणार आहेत.

त्यामुळे सदर काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत असलेल्या स्टोर्म लाईन, पाणीपुरवठा लाईन, एमएसईबी केबल्स याच्याशी निगडीत असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचना माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिले आहे.

अपघाताचे प्रमाण थांबणार…
या रस्त्यावर खोदाई केल्यामुळे त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. अनेकदा किरकोळ अपघात होत असतात. त्या बाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या या तक्रारी पाहता त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी काटे यांनी पुढाकार घेतला. हा रस्ता विकसित झाल्यास अपघाताचे प्रमाण देखील कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button