breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मतदारसंघाकडे निघालेले आमदार संतोष बांगर पुन्हा मुंबईला परतले; मातोश्रीवरून आला आदेश

हिंगोली : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे निवासस्थान सोडल्यानंतर मुंबईतील आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले . या आदेशानंतर मतदार संघात परतण्यासाठी निघालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना पुन्हा एकदा तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोलीच्या कळमदूरी मतदारसंघात परतणारे शिवसेना आमदार संतोष बांगर हे नाशिक वरून पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा राखणाऱ्या आमदारांपैकी संतोष बांगर हे एक आमदार आहेत, बांगर हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, त्यानंतर आज ते हिंगोलीत येण्यासाठी मुंबई वरून निघाले होते मात्र मातोश्रीच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा एकदा मुंबईकडे परतावे लागले आहे. बांगर हे गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये असल्यामुळे कार्यकर्ते देखील त्यांच्या संपर्कापासून तुटले होते. हिंगोली जिल्ह्यांमध्ये संतोष बांगर यांची सध्या वेगळी ख्याती निर्माण झालेली आहे. ते उद्धव ठाकरे यांचे अगदी निकटवर्तीय मानले जातात.

संतोष बांगर यांच्यावर बाळासाहेब यांनी जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तेव्हापासून त्यांनी ती अगदी एक निश्चितपणे निभावल्या मुळे ठाकरे कुटुंबीयांचा सुद्धा त्यांच्यावर तेवढाच विश्वास आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे संतोष बांगर यांच्या सुद्धा निर्णयाकडे सुद्धा अनेक कार्यकर्ते व शिवप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार भूमिका स्पष्ट केल्यानंतर मात्र सुरू उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button