breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडी

WhatsApp चा प्रतिस्पर्धी Signal चे भारतातील आगमनावर सह-संस्थापक म्हणाले…

व्हॉट्स अॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्याने ग्राहकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता ‘सिग्नल’चे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतीय लोकांना सिग्नलचे यूजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे मत ब्रायन अॅक्टन यांनी मांडलय. ते एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“भारत एक विविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे सिग्नल या ठिकाणी हिंदीसह 12 भाषामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माझे भारतीय सहकारी इथल्या बाजारपेठेविषयी मला बरीच उपयुक्त माहिती देतात. त्यामुळे प्रोडक्ट आयडियाचा अंदाज येण्यास मदत मिळते. भारत जगातला असा प्रमुख देश आहे की जर तुम्ही भारतासाठी काही उत्पादन निर्माण करत असाल तर ते तुम्ही जगासाठी निर्माण करत असता.”

ब्रायन अॅक्टन म्हणाले की, “भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीय लोकांना सिग्नलचे यूजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यूजर्सनी आपल्या डिजिटल प्रायव्हसी सोबत कोणतीही तडजोड करु नये यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

सिग्नलची व्हॉट्सअॅपच्या तुलनेवरती ब्रायन अॅक्टन म्हणाले की, “आमच्याकडे प्रायव्हसी फिचर्स, डिसअपीयरिंग मेसेज अशा प्रकारच्या सुविधा आहेत. सिग्नलचे सर्व मेसेज एनक्रिप्टेड आहेत, यात मेटाडाटाचा समावेश आहे.”

सिग्नलचे सह-संस्थापक असलेले ब्रायन अॅक्टन हे व्हॉट्स अॅपचे देखील संस्थापक होते. ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी 2014 साली व्हॉट्स अॅपची मालकी फेसबुकला विकली. त्यानंतर 2017 साली फेसबुकशी काही मतभेद झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडायचा निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button