breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीच्या समस्येवर आमदार लांडगे यांची ‘ऑन द स्पॉट ऍक्शन’

  • डुडूळगाव येथील स्टेला सोसायटीत रहिवासी अधिकाऱ्यांसह बैठक

पिंपरी । प्रतिनिधी
डूडूळगाव येथील स्टेला सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटीला पार्किंग, लाईट, पाण्यासह अनेक अडचणींना ग्रासल्याने त्याठिकाणी राहणे अवघड झाल्याचे चित्र होते. याबाबत माहिती मिळताच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोसायटी रहिवासी आणि संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. विशेष म्हणजे, सोसायटीधारकांनी मांडलेल्या प्रश्नांवर ‘ऑन द स्पॉट ऍक्शन’ घेत त्या सोडवण्याच्या सूचना दिल्याने सोसायटीधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

स्टेला सोसायटीत परिसरात बुधवारी (दि.३०) ही बैठक घेण्यात आली. यावेळी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, स्टेला सोसायटीच्या सर्व विंगचे चेअरमन व इतर पदाधिकारी, महापालिका बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण अभियंता यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार महेश लांडगे यांनी सोसायटीधारकांशी थेट संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. त्या अडचणींवर त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये पाण्यासाठी नवीन लाईनवरून १५ कनेक्शन जोडून देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच अयोग्य पार्किंग प्रश्नावर बिल्डरसोबत चर्चा करण्याच्या सूचना केल्या. तसेच सदनिकेमधील अंतर्गत गळतीबाबत बिल्डरवर कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना करणार असल्याचे सांगितले. संबंधित सोसायटी धारकांना विचारल्याशिवाय कोणत्याही सोसायटीची कॉमन लाईट कट करू नये अशा सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान आमदार लांडगे यांनी स्वतः बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष अडचणी सोडवल्यामुळे सोसायटीधारकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

वेगळा फिडर बसवा; जागा देतो…
सोसायटीमहदये वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दा सोसायटीधारकांनी उपस्थित केला. यावर लोकसंख्या वाढल्याने मोशीतील फिडरवरून डूडुळगाव व इतर परिसराला लाईट सप्लाय होत असल्याने लोड वाढून अडचण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी लांडगे यांनी वेगळा फिडर बसवा, जागेची पाहणी करून जागा उपलब्ध करून मी देतो असे आमदार महेशदादा यांनी सांगितले. यामुळे किचकट आणि वेळखाऊ असणारा विजेचा प्रश्न तात्काळ सुटला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button