breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘वाह!, क्या चौकीदार है’, ओवेसींची नरेंद्र मोदींवर सडकून टिका

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नमो अॅपवरून टी-शर्टची विक्री होत आहे. त्यावरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत, आणि इकडे नमो अॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. ‘वाह क्या चौकीदार है!’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

जेट एअरवेज बुडत आहे आणि इकडे चौकीदार एसबीआयचे १५०० कोटी रूपये देत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली हजारो कारखाने बंद पडले आहेत. तुम्ही या छोट्या उद्योगांना कर्ज देऊ शकत नाही का, असा सवाल ओवेसी यांनी व्यक्त केला आहे.

बालाकोट एअर स्ट्राइक पूर्वी ३०० मोबाइल अॅक्टिव्ह होते, असे एनटीआरओचा हवाला देऊन सरकारकडून सांगण्यात येते. पण मोदी सरकार हे सांगत नाही की पुलवामा दहशतवादी हल्ल्यापूर्वी २५० किलो आरडीएक्स कसे पोहोचले. हे सरकार केवळ देशांतर्गत बाबींवर अपयशी ठरले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. देशातील शेतकरी संकटात आहे. सामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण सरकार आपल्या यशाचे खोटे गोडवे गाण्यातच दंग आहे. या निवडणुकीत भाजपाच पराभव होणार आहे. देशातील राजकीय वातावरण मोदी सरकारच्या विरोधात आहे. तुम्हा सर्वांना हे २३ मे रोजी दिसून येईल, असेही ओवेसी यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button