ताज्या घडामोडीमुंबई

लष्करी जवान अटकेत : परदेशी महिलेचा एक्स्प्रेसमध्ये विनयभंग

कल्याण | पोर्तुगालमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेचा धावत्या एक्स्प्रेसमध्ये कल्याण-कसारा दरम्यान विनयभंग करणाऱ्या एका लष्करी जवानाला दोन वर्षांनंतर अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. दोन वर्ष पोलीस या जवानाच्या मागावर होते.

साहिश टी असे आरोपीचे नाव आहे. तो लष्कराच्या केरळ तळावर कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालची एक महिला भारतात पर्यटनासाठी आली होती. ती १४ फेब्रुवारी २०१९ रोजी गोवा-दिल्ली निजामुद्दिन एक्स्प्रेसने प्रवास करत होती. एका प्रवाशाने रात्री तिचा विनयभंग केला होता. कल्याण-कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. या प्रकाराची त्या महिलेने भारतीय दुतावासाकडे तक्रार केली होती. दुतावासाकडून ही तक्रार रेल्वेच्या वरिष्ठांकडे गेली होती. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

एक्स्प्रेसमधील घटनेचे कोणतेही धागेदोरे लोहमार्ग पोलिसांकडे नव्हते. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना दुसाने यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास अधिकारी दुसाने यांनी आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळविला. मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण, महिलेने आरोपीच्या केलेल्या वर्णनावरून समाजमाध्यमांतून एक संशयित दुसाने यांना आढळला. तो लष्करी जवान आहे. केरळ तळावर सक्रिय असल्याची माहिती त्यांना मिळाली.

आपल्या मागावर पोलीस आहेत याची कुणकुण साहिशला लागताच त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. साहिश जामिनासाठी प्रयत्न करतो आहे हे समजताच आरोपी तोच आहे यावर दुसाने यांचा संशय बळावला. साहिश कल्याणमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. सापळा लावून दुसाने यांच्या पथकाने साहिशला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button