breaking-newsआंतरराष्टीय

MI ने लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स

आपल्या दर्जेदार व स्वस्त स्मार्टफोन्ससाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या ‘एमआय’ने दोन नवे स्मार्टफोन्स चीन मध्ये लाँच केले असून त्यांचे नामकरण रेडमी ६ प्रो व एमआय पॅड ४ असे करण्यात आले आहे.

रेडमी ६ प्रो हा स्मार्टफोन मिड-बजेट स्मार्टफोन असून चीन मध्ये ९९९ युआन (सुमारे १०५०० रुपये) मध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोन मध्ये आयफोन एक्स प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला असून, स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, ५.८४ इंचाचा फुल्ल एच.डी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ३ किंवा ४ जी.बी. रॅम व ३२ किंवा ६४ जी.बी. स्टोरेज अशा व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. रेडमी ६ प्रो मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सुविधा देण्यात आली असून १२ व ५ मेगापिक्सेलचे बँक कॅमेरे तर ५ मेगापिक्सेल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ४००० एम.ए.एच बॅटरी क्षमता असणारा हा फोन अँड्रॉइड ओरिओ या सॉफ्टवेअर यावर काम करेल. ब्लॅक, रेड, ब्लू, गोल्ड आणि पिंक अशा पाच रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.


रेडमी ६ प्रो बरोबर लाँच करण्यात आलेले शाओमी एमआय. ४ हे टॅबलेट देखील आकर्षक फीचर्स शीत लाँच करण्यात आले असून यामध्ये ८ इंचाचा फुल्ल एच.डी. डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर व १३ व ५ मेगापिक्सेल्स चे कॅमेरे देण्यात आले आहेत. एम.आय. ४ ची किंमत १०९९ युआन म्हणजे सुमारे ११५०० एवढी ठेवण्यात आली आहे .
हे स्मार्टफोन्स भारतामध्ये कधी दाखल होणार आहेत याबाततची कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button