breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

नीरज चोप्राचा मोठा निर्णय! २०२१ मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही कारण…

नवी दिल्ली |

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुर्वणपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजचे लाखो चाहते आहेत. भारतात परतल्यापासून नीरज वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येत आहे. आता त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करताना पाहायचे आहे. मात्र, यंदाच्या वर्षी हे शक्य होणार नाही. याविषयी नीरजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

नीरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने सगळ्यांचे आभार मानले आहे. ‘टोकियो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्व देशवासियांचे खूप खूप आभार. माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी ऑलिम्पिकच्या मंचावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला आणि देशासाठी पदक पटकावले’, असे नीरज म्हणाला.

पुढे २०२१ मध्ये तो कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगत तो म्हणाला, सतत सुरु असलेला प्रवास आणि या सगळ्यात माझी तब्येत ठीक नसल्याने मला ट्रेनिंग सुरु करता आली नाही, यामुळे मी आणि माझ्या टीमने २०२१ चा स्पर्धांचा माझा सीझन इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे थोडा आराम करून पुन्हा एकदा ट्रेनिंग करत २०२२ मध्ये असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयारी करणार आहे. पुढे नीरज म्हणाला, गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण देशातून अॅथलेटिक्सला मिळालेला पाठिंब्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि भविष्यातही अशा प्रकारे देशाच्या सर्व खेळाडूंना सतत पाठिंबा देत रहा अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button