breaking-newsराष्ट्रिय

तोट्यात असलेल्या १९ मोठ्या सरकारी कंपन्या बंद करण्याचे मोदी सरकारचे आदेश

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स सारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. प्रकाश यांनी अवजड उद्योग आणि लोक उद्योग मंत्रालयाला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सध्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याची विनंती केली. ‘सरकार तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) बंद करण्याचा किंवा त्यांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे का?’, असा सवालही प्रकाश यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी सरकारमधील केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली. याच वेळी सावंत यांनी तोट्यात चालणाऱ्या १९ सरकारी कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे असं सांगत या कंपन्यांची यादी जाहीर केली.

बंद होणाऱ्या कंपन्या

तुंगभद्रा स्टील प्रोडक्ट्स लिमिटेड
एचएमटी वॉचेस लिमिटेड
एचएमटी चिनार वॉचेस लिमिटेड
एचएमटी बेअरिंग्स लिमिटेड
हिंदुस्तान केबल्स लिमिटेड
एचएमटी लिमिटेडच्या मालकीचे टॅक्टर युनिट आणि इंन्स्टुमेंटेशन लिमिटेडचा कोट्टा येथील कारखाना
केंद्रीय अंतर्देशीय जल परिवहन निगम लिमिटेड
इंडियन ड्रग्स आणि राजस्थान ड्रग्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड
आयओसीएल क्रेडा बायोक्युएल लिमिटेड
क्रेडा एचपीसीएल बायोक्युएल्स लिमिटेड
अंदामन आणि निकोबार वन आणि वृक्षारोपण विकास निगम लिमिटेड
भारत वॅगन अॅण्ड इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड
बर्न स्टॅण्डर्ड कंपनी लिमिटेड
सीएनए/एन टू ओ फोर प्लॅण्ट वगळता हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेडच्या रसायन क्षेत्रातील सर्व कारखाने
ज्यूट मॅन्युफॅक्चर्स कॉर्पोरेशन लिमिटेड
बर्डस ज्यूट अॅण्ड एक्सपोर्ट लिमिटेड
एसटीसीएल लिमिटेड

१९ कंपन्या बंद करण्याला परवाणगी देण्याबरोबरच सरकारने २५ हून अधिक कंपन्यांना निर्गुंतवणुकीस परवाणगी दिली आहे. या कंपन्यांच्या यादीमध्ये एचपीएल आणि हिंदुस्तान कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button