TOP Newsताज्या घडामोडीपुणे

नवले ब्रिज पुढे आहे’; सतत अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले अनोखे बॅनर

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बाह्य वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दिलेल्या धडकेत तब्बल ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर आज अखेरपर्यंत चार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याच दरम्यान विभागीय आयुक्त,पुणे महापालिका, पुणे पोलीस, जिल्हाधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात आली. त्या मार्गावर विशेष उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पण आता हा नवले पुल पुन्हा एकदा चर्चेत आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस भुपेद्र मोरे यांनी सावधान नवले ब्रिज पुढे आहे, असा मजकूर असलेले फ्लेक्स जागोजागी लावले आहेत. या फ्लेक्सची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवले पूलावर अपघातांची सत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघात झाला होता.  ट्रकचालकांने धडक दिल्याने ४८ वाहनांचे नुकसान झाले होते. तर दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने सात वाहनांना धडक दिली होती.

प्रशासनाकडून तातडीच्या उपयायोजना

कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने अपघात होत असल्याने या भागात चालू वर्षाच्या सुरुवातीला प्रशासनाकडून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी महामार्गावर सुरक्षा अडथळे, रम्बलर स्ट्रीप, वेग मर्यादा निश्चित करणे, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे आदी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. आता पुन्हा कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाकडे येतानाचा तीव्र उतार कमी करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरीपूल मधील तीव्र वळण कमी करणे अशा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button