breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात पाऊसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

राज्यातील या भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्यानुसार, पुण्यासह राज्याच्या काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये ६ ते ८ एप्रिल दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या काळात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान बदलानुसार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाकडून वर्तवली गेली आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

पुणे व राज्यातील इतर अनेक शहरांचे तापमान ४० अशांवर गेले आहे. तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत ७,८ आणि ९ तारखेला विजांच्या कडकडासह हलक्या पावसाची शक्यता आहे. ६ तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button