ताज्या घडामोडीमुंबई

एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्यच; राज्य सरकारचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला आहे. आज एसटी विलीनीकरणाच्या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात आला होता. अहवाल सभागृहात ठेवल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर विधानसभेत परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीचे विलानीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आता शुक्रवारी २५ मार्च रोजी या अहवालासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहात निवेदन सादर करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकारने तीन महिने वेळकाढूपणा का केला असा सवाल करत या निर्णयचा फेरविचार करण्याची मागणी केली.

तथापि, हायकोर्टाने नेमून दिलेल्या या समितीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नसल्याचे मत नोंदवले होते. एवढेच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एसटी विलीनीकरण शक्य नसल्याचे सभागृहात स्पष्ट केले होते. त्यानंतर आज हा अहवाल स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेकडो कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत.

दरम्यान, एसटी संपाबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आता आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये. कुठल्याही परिस्थितीत तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा, असे दरेकर यांनी म्हटले आहे. हायकोर्टात विलीनीकरणाच्या मुद्यावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ हवी असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. हायकोर्टाने ही विनंती मान्य करत राज्य सरकारला मुदत होती.

शहापूरमधील एसटी बसचालक
शिवनाथ फापाळेची आत्महत्या

चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे पगार बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवनाथ ज्ञानदेव फापाळे या एसटी बसचालकाने नाशिकमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर आगारात कार्यरत होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. या मागणीसाठी ४ महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. संपामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे शिवनाथ फापाळे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर बस आगारात तो चालक म्हणून कार्यरत होता. आर्थिक विवंचनेतून त्याने हे पाऊल उचलले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button