breaking-newsराष्ट्रिय

कोरोना वरील लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश : केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे

नवी दिल्ली : सर्वांसाठी सकारात्मक बातमी आली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर सुरू असलेल्या लसीच्या संशोधनाला यश येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांनी आज दिली. कोरोना लसीच्या क्लिनीकल ट्रायल पूर्ण झाल्या असून आता मानवी चाचणी सुरू असल्याचेही चौबे यांनी सांगितले. या चाचण्या यशस्वी झाल्या तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

पीपी मॉडेलच्या मल्टीपल ब्लडसह आयजीजी अँटीबॉडी तपासणी मशीनद्वारे अवघ्या एका तासात रिझल्ट येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज पटना येथील एम्समध्ये फोन करुन कोरोनावरील लसी संदर्भात माहिती घेतली. यावेळी कोविड 19 रुग्णांची विचारपूसही त्यांनी केली. सोबतचं त्या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली.

पीपी मॉडेल वर विट्रोस ईसीआईक्यू (VITROS ECIQ) इम्यून डायग्नोस्टिक सिस्टम सँपल मशीन पटना येथील एम्स रुग्णालयात इंस्टॉल करण्यात येणार आहे. या मशीनमुळे आयजीजी अँटीबॉडी टेस्ट आणि 3100 विविध प्रकारच्या ब्लडची तपासणी होणार आहे. यामुळे एका तासामध्ये ब्लड टेस्टचा रिझल्ट मिळणार आहे. ज्यामुळे प्लाझ्मा थरेपी आणि इतर तपासणी वेगाने करण्यात मदत होणार आहे. एका आठवड्यात ही मशीन एम्समध्ये बसवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button