breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीमध्ये नागपंचमी निमित्ताने मेहंदी स्पर्धा उत्साहात

कविताताई भोंगाळे युवा मंच व गायत्री सखी मंचचा पुढाकार

पिंपरी : रोजच्या धकधाकीच्या शहरी जीवनातून महिलांना विरंगुळा मिळावा तसेच महिलांमधील सुप्तगुणांना चालना मिळावी यासाठी गायत्री सखी मंच व कविताताई भोंगाळे युवा मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी परिसरातील महिला व युवतीं करीता नागपंचमीचे औचित्य साधून, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

भोसरी परिसरातील सर्व महिला भगिणी करीता ही स्पर्धा खुली होती. भोसरीतील संत तुकारामनगरमधील तुकाराम मंदिरात सर्व महिला  त्यांनी आपआपल्या हातावार  विविध प्रकारच्या नक्षीच्या मेहंदीचे रेखाटन केले. सुबकता या स्पर्धे अंतर्गत बहुतांश मेहंदीच्या नक्षीतून विविध सामाजिक संदेश देण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यावेळी स्मिता अतालकर, वर्षा तेलगोटे, अमरीन पटेल, मोहिनी भोसले, निवेदिता माने, सोनाली कदम, मेघा सोनवणे, अनुष्का शिंदे, भारती सूर्यवंशी, कल्पना धाडसे, माधुरी मारोतकर, दिक्षा कदाळे आदीसह भोसरी परिसरातील शेकडो महिला उपस्थित  होत्या.

गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता भोंगाळे- कडू म्हणाल्या की, महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा स्त्रीच्या ठायी असलेली, कल्पकता, सर्जनशीलता, समाजासमोर यावी व स्त्री ने देखील राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभाग नोंदवावा या हेतूनेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.समाजात वावरतांना बहुतांश गृहीणी या प्रापंचिक जबाबदार्‍या पार पाडण्यात व्यस्त असतात. इच्छा असूनही त्या आपल्या ठायी असलेल्या कला गुणांना वाव देऊ शकत नाही. आपल्या आवडी-निवडी जोपासू शकत नाही. अशा  या गृहीणींच्या मनाला थोडा विरंगुळा मिळावा, रोजच्या संसारीक जाबबार्‍यामधून थोडा वेळ काढून त्यांनी एकत्र यावे, त्यांच्या विचारांची देवाण – घेवाण व्हावी, विविध  सामाजिक विषयावर त्यांच्यामध्ये सामुहिक  चर्चा व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांनी व्यक्त केले समाधान…

गायत्री सखी मंच द्वारा विविध पारंपरिक सणावाराचे , उत्सवाचे औचित्य साधून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यापैकीच हा मेहंदी स्पर्धेचा उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारा आम्हास आमच्यातील गुणविशेष समाजासमोर सादर करण्याचे व्यासपीठ गायत्री सखी मंचाने उपलब्ध करवून दिले. त्याबद्दल गायत्री सखी मंच व कविताताई भोंगाळे- कडू यांना आम्ही धन्यवाद देतो, असे मत या स्पर्धेत सहभागी महिलांनी व्यक्त केले. गायत्री सखी मंच द्वारा या स्पर्धेनिमित्त जमलेल्या व या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना मेहंदीच्या कोनांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, सुबक, सुंदर व आकर्षक मेहंदी रेखाटलेल्या महिलांना उत्तेजनार्थ, प्रथम , द्वीतीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button