breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्याराने खून, आरोपीला अटक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाने एकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना चाकण येथील जांबुकरवस्ती, खराबवाडी याठिकाणी रविवारी (दि. 3) दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

विजय लक्ष्मण गायकवाड (वय 42, रा. मु. पो. जांबुकरवस्ती, खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश लक्ष्मण घोलप (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड) याला अटक केली आहे. सुनिता विजय गायकवाड (वय 39) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेशचे सुनिता गायकवाड यांच्या मुलाशी कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून मुकेशने शनिवारी (दि. 3) मुलाचे वडील विजय गायकवाड यांच्याशी भांडण काढले. त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खुन केला. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button