breaking-newsराष्ट्रिय

अनैतिक संबंधांबद्दल जाब विचारणाऱ्या पत्नीला पोलिसाकडून अमानुष मारहाण

तिला नवऱ्याने खेचत घराबाहेर आणलं, जमिनीवर आपटलं, व केसांना पकडून सर्वांसमक्ष पायातून चप्पल काढून बेदम मारहाण केली. हे सर्व नवऱ्याने केल ते फक्त तिने त्याच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडलेला आहे.

या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच हे कृत्य केलं आहे. विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून गांधवानी पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र सुर्यवंशी यांनी बायकोला अमानुष मारहाण केली आहे. मंगळवारीही घटना घडली. काही लोकांसह पोलीसही तिथे होते. ते नरेंद्रला रोखण्याचे प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. या प्रकरणी नरेंद्र सुर्यवंशीची चौकशी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button