TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मावळात विकास कामांचा धडाका सुरुच!

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 13 कोटींच्या कामांचे भूमीपूजन, उद्घाटन

पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुक्यात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा विकास कामांचा धडाका सुरुच आहे. पवना मावळातील विविध गावांमध्ये 13 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन खासदार बारणे यांनी केले. गावांमध्ये चांगले रस्ते झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार बारणे यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हूलावळे, उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खंडभोर, शिवसेना उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना देहूगावचे शहर प्रमुख सुनील हगवणे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, अकुंश देशमुख, मुन्नाभाऊ मोरे, सरपंच,उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, करंज बेडसे, कडधे, येळसे, पवनानगर – काले, मळवंडी प. मा, थुगांव आणि शिवणे येथील तब्बल 13 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. या भूमिपूजनाच्या निमित्ताने खासदार बारणे स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाला खासदार निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी खासदार बारणे यांचे आभार मानले. खासदार बारणे यांचा मावळात दांडगा जनसंपर्क आहे. प्रत्येक गावातील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत संपूर्ण मतदारसंघात चांगले जनमत आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विकासाच्या दृष्टीकोणातून सर्वाधिक निधी मावळला दिला आहे. मावळात गावे विस्तारली आहेत. प्रत्येक गावात जाण्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला. माझे कर्तव्य मी पार पाडले आहे. राज्यात चांगल्या विचारांचे महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासत नाही. भरघोस निधी मिळत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निधीतून मावळात मोठी विकास कामे केली. जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे केली. सामाजिक न्याय, नगरविकास, जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला. एमएमआरडी, पीएमआरडीएच्या माध्यामातूनही अनेक कामे मार्गी लावली आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत तळेगाव-चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम लवकरच सुरु होईस. या सरकारच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. कार्ला एकविरा देवी विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पर्यटनासाठी निधी जाहीर केला आहे. लोणावळा, खंडाळ्यातील पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. विकासासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री भरघोस निधी देत आहेत. केंद्रात, राज्यात एका विचाराचे सरकार असल्यामुळे त्याचा फायदा मावळ तालुक्याच्या विकासासाठी होत असल्याचेही खासदार बारणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button