breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! बंद खोलीत माय-लेकींचा सडलेला मृतदेह सापडले; परिसरात उडाली खळबळ

फारुखाबाद: उत्तर प्रदेशातील फारुखाबाद शहरातील पोलीस हद्दीमध्ये मंगळवारी एक धक्कादायक कृत्य समोर आलेलं आहे. येथे एका घरात माय-लेकीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. माय-लेकीचा मृतदेह सापडल्यानंतर गावात भीती पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाल गेट घटिया घाट रोडजवळील कबाडा गल्लीत दुर्गंधी पसरलेली होती. मृतदेह सापडल्याच्या शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांनी कळवलं आहे. पोलिसांनी खोलीचं दार उघताच त्यांना धक्काच बसला आहे. तेथे द्वारिका प्रसाद यांची पत्नी रामकली (60) आणि त्यांची मुलगी (35) याचा मृतदेह पडलेला होता. तो मृतदेह पूर्णपणे सडला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button