breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

रिलायन्सच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान

नागपूर | प्रतिनिधी 
नागपूरच्या निमची गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पहाटे लागलेल्या आगीमुळे स्थानिकांना मदत मिळवण्यात अडचण झाली. नागपूरच्या निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला आग लागली आहे. गुरुवारी पहाटे आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोदामात रिलायन्स स्टोअरमधून विकले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. यात मोठं नुकसान झाल्याची शक्यता. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आगीत मोठी वित्त हानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button