पहिले लग्न झाल्याचे न सांगता महिलेसोबत विवाह आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/rape_clipart.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पहिले लग्न झाल्याचे न सांगता महिलेसोबत लग्न केले. लग्नाच्या दिवशी महिलेला पहिल्या लग्नाबाबत सांगून तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार सन 2015 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडला.
महेश दिनकर इंदलकर (वय 41, रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे न सांगता खोटे आश्वासन दिले. फिर्यादीसोबत मंदिरात लग्न करताना पहिल्या लग्नाबाबत आरोपीने सांगितले. लग्न झाल्यावर आरोपीने पहिल्या पत्नीसोबत फिर्यादीला देखील सांभाळतो असे खोटे आश्वासन देत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीसोबत त्यांच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.