breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मराठवाडा कार्ड’; निर्णायक ‘व्होट बँक’ मिळवण्याचा प्रयत्न

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘मराठवाडा कार्ड’ वापरण्याची शक्यता आहे. मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे यावर शिक्कामोर्तब केले आहे.

यापूर्वीच, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. खडसे आणि मराठवाडा, खानदेशशी नाळ जोडलेला मोठा कामगारवर्ग पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे.

वाल्हेकरवाडी, काळेवाडी, डांगे चौक, रहाटणी यासह संपूर्ण शहरातील विविध भागांमध्ये मराठवाड्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत.

मूळचे मराठवाड्यातील पण पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले पिंपरी-चिंचवडकर मराठवाडा विकास संघाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडले जाणार आहेत. त्यातच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात अरुण पवार यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे मराठवाडा कार्ड वापरुन राष्ट्रवादी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत किमान ७ ते १० नगरसेवक निवडून आणता येतील, असा निर्णायक मतदार मराठवाड्याशी संबंधित आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button