breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लष्कराची मोठी कारवाई; लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सोपोर – जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरातील गुंड ब्राथ भागात दहशतवादी आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली असून यावेळी भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत ‘लश्कर-ए-तोयबा’च्या एका कमांडरसह तीन दहशहतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काल (२० जून) रात्री जम्मू काश्मिरातील सोपोर परिसरात असलेल्या गुंड ब्राथ भागात लष्कराचे जवान आणि लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. यावेळी ३ पोलीस कर्मचारी, २ नगरसेवक आणि २ नागरिकांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या मुदसीर पंडित यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सुरक्षा जवानांनी जोरदार कारवाई करत सुरुवातीला एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्यानंतरही गोळीबार सुरूच राहिला. त्यानंतर जवानांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले असून, लष्कराची शोध मोहीम अद्याप सुरूच आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button