breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

ताथवडेतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प, उड्डाणपुलाच्या कामाला ‘बुस्टर डोस’

पशुसंवर्धन विभागाकडील जागा हस्तांतरणाला मिळाली मान्यता

आमदार महेश लांडगे यांचा अधिवेशनात यशस्वी पाठपुरावा

पिंपरी : ताथवडे येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी वळू माता प्रक्षेत्रातील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामाला आता ‘बुस्टर डोस’ मिळाला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवना नदीचे वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि वाल्हेकरवाडी चौक ते औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी एकूण ५ हजार १८१७ हेक्टर जमीन महापालिकेला उपलब्ध व्हावी. या करिता गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. त्यावेळी जागा हस्तांतरणाबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून सूचना केल्या होत्या. त्यानुसार, राज्याच्या कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांना ताथवडे येथील वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे येथील ५.१८ हेक्टर (क्षेत्र ५१८१७.९३७ चौ.मी.) जमीन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

…या अटींचे करावे लागणार पालन!

पशुसंवर्धन विभागाकडील जागा ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला काही अटी-शर्तींची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थान ते बोट क्लबपर्यंतच्या संरक्षक भिंतीची उंची ३ फूट आर.सी.सी.मध्ये बांधकाम करुन वाढवण्यात यावी. त्यावर ३ फूट वाय-फेसींग करुन देण्यात यावे. प्रक्षेत्रातील अंतर्गत ६ कि.मी. रस्ते सिमेंट काँक्रिट करुन देण्यात यावे. पंप हाउस दुरूस्ती करण्यात यावी. व पाईपलाईन बदलून देण्यात यावे. ताथवडे प्रक्षेत्राकरीता नवीन कार्यालयाचे बांधकाम करुन द्यावे. औंध येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी निवासस्थान, बगीचा, गॅरेज, सर्व्हंट निवास, संरक्षक भिंत बांधून द्यावी. तसेच, विश्रामगृह, वाहनचालक, सर्व्हंट व खानसामा यांची व्यवस्था आणि प्रक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता एकूण ४७ ऐवजी २७ निवासस्थानाचे बांधकाम करुन देण्यात यावे, अशा अटींची पूर्तता महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.

पवना नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच, ताथवडे आणि सभोवतालच्या भागातील वाहतूक सक्षम होण्याकरिता उड्डाणपुल महत्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पांच्या कामासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. त्यामुळे मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

  • महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button