breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय आरक्षण: ओबीसी समाज भाजपाला माफ करणार नाही : संजोग वाघेरे-पाटील

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जोरदार निदर्शने

आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला फटका बसणार

 

पिंपरी । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य ओबीसी समाज भाजपाला कदापि माफ करणार नाही, असा संताप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने ओबिसीचे राजकीय आरक्षण स्थगित केल्याने राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा तर्फे मंडल दिनानिमित्त निषेध आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस तर्फे ओबीसीचे राजकीय आरक्षण केंद्र सरकारने स्थगित केल्याने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंद्र सरकारचा जाहीर करण्यात आला.

यावेळी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय लोखंडे, महिला शहराध्यक्षा सरिता पवार, प्रदेश उपाध्यक्ष सतीश दरेकर, कविता खराडे, पि.के महाजन, किशोर कळसकर, गौरव किरवे, ईश्वर कुदळे, महेश भागवत, चंद्रशेखर भुजबळ यांनी भाजप सरकारचा निषेध करत विचार व्यक्त केले.

या आंदोलनास नगरसेविका संगीता ताम्हाणे, सतीश चोरमले,मनोज सुतार, रमेश सायकर, प्रदीप आहेर, विशाल जाधव, माधव पाटील,संतोष माळी,अरविंद बनकर, प्रमोद ताम्हाणे,प्रकाश आल्हाट, उत्तम आल्हाट, कविताताई आल्हाट, विशाल आहेर,चंद्रकांत जाधव, विद्या शिंदे,संगीता आहेर, मीरा कुदळे, स्मिता वाघोले हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महिला अध्यक्षा सारिका पवार म्हणाल्या की, ओबीसींचे  राजकीय आरक्षण केंद्र सरकारने स्थगित केले आहे त्यामुळे महिलांचे राजकीय नुकसान हे भाजप सरकार करत आहे.

राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे निरीक्षक ॲड.सचिन औटे म्हणाले की, ज्यावेळेस देशात मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय माजी पंतप्रधान वि. पी. सिंग यांनी घेतला त्यावेळेस त्याविरोधात भाजपने कमंडल यात्रा काढली याचा अर्थ भाजप हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध आहे.

विजय लोखंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार व छगन भुजबळ साहेबांनी केली त्यामुळे ओबीसींना राजकीय शैक्षणिक आरक्षण मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button