breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! ‘हे भारत माते मला माफ कर’, छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

पंढरपूर |

पंढरपूर तालुक्यातील शेळवे इथं गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे अयं या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या  स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या बाबत सविस्तर हकीकत अशी की, सत्यवान प्रभु गाजरे (वय 43) हे शेळवे गावात पंम्चरचे दुकान चालवतात. 

मयत मुलगी स्वप्नाली ही इयत्ता 11वी मध्ये केबीपी कॉलेज येथे शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून येऊन जाऊन करत होती. शुभांगी ही इयत्ता 12वी मध्ये वाडी कुरोली येथे कॉलेजला जात होती. सध्या लॉकडाउन लागल्यामुळे घरीच आनलाइन शिक्षण घेत होती. 6 डिसेंबर रोजी स्वप्नालीने राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी 9 डिसेंबर रोजी  मयत स्वप्नाली हिचे शाळेची बॅग तपासले असता त्यात अर्धे पानाची चिठ्ठी सापडून आली होती. या चिठ्ठीत तिने आत्महत्येच कारण लिहिलेले आहे.

आवश्य वाचा- स्वत:हून संबंध ठेवल्यानंतर मुलीच बलात्काराची तक्रार करतात, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोठ वक्तव्य

“किती सहन करू मी मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेनं हात धरुन केलेली छेडछाड आणि कुणाला सांगु नको म्हणून दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही. लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवून दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा.या पोरांना घेवून नाचायचा. सगळे जण स्वप्नाली म्हणून नववी पासूनच चिडवायची. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केलं पण आता सहन होत नाही म्हणून मी आज माझं जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई-बापू मला माफ करा आत्महत्या करणे गुन्हा आहे. तरी सुद्धा मी करतेय” असा मजकूर स्वप्नालीने चिठ्ठीत लिहिलेला होता.

दरम्यान, फिर्याद दाखल करून घेण्याबात उशीर झाल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे विचारणा केली असता सदर मुलीने आत्महत्या कारण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट हि एका बॅगमध्ये ठेवलेली आढळलेली आहे. त्यानंतर सदर मुलीच्या पित्याने संपर्क करून आम्हाला याची माहिती दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

आवश्य वाचा- आज रात्री 12.30 पासून RTGS सुविधा ग्राहकांसाठी 24 तास चालू होणार: RBI

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button