breaking-newsमहाराष्ट्र
काँग्रेसच्या शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापौर
कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची निवड झाली आहे. शोभा बोंद्रे यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला. महापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांचा 11 मतांनी विजय झाला. शोभा बोंद्रे यांना 44 मतं मिळाली तर निकम यांना 33 मतं मिळवता आली.
शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले तटस्थ राहिल्यामुळे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आजच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.