breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महात्मा फुले शिक्षक दिनाचे खरे हक्कदार’ – अरूण चाबुकस्वार

पिंपरी  – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून शिक्षक दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून शिक्षक दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार मुख्याध्यापिका आसावरी घोडके उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सौ. निर्मलाताई कुटे (नगरसेविका पि. चि.म.न.पा),ऋषिकेश चोरगे महाराज (ह.भ.प पुणे),संदिप चाबुकस्वार,सुरेश भालेराव, तात्या शिनगारे, युवराज प्रगणे, डॉ.वसंत चाबुकस्वार,राजेश भालेराव,स्वप्नील घोगरे या सर्वांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. “स्ञी शिक्षण जनक लेखक, कवी सममाजसुधारक महात्मा जोतिराव फुले लोकांना अंधकारातून बाहेर काढण्याचे त्यांनी आयुष्यभर कार्य केले १ जानेवारी १८४८रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणांचा पाया रचला.असे अरूण चाबुकस्वार यांनी उद्गार काढले”.

५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस म्हणून आपण साजरा करतो. शिक्षण क्षेत्रात आपल्या व्यक्ति- महत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सर्वांकडून सन्मान मिळवला ते महान शिक्षक म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषयावरही उत्तम अभ्यास झालेला होता.
आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसऱ्याला सांगावे, हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.

शिक्षक का अर्थ
शि:- शिखर तक ले जाने वाला
क्ष:- क्षमा की भावना रखने वाला
क:- कमजोरी दूर करने वाला
वही तो शिक्षक कहलाता है।
यावेळी शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचा सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी यांनी केले तर आभार शारदा थोरात यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button