breaking-newsआंतरराष्टीय

मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन : मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 59 वर्षीय राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा झाली होती.

अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं.

तहव्वुर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसात अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचं प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

अमेरिकी वकिलांनी सांगितलं, “आरोपी तहव्वर राणा याने शिकागोमध्ये दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्याची ही शिक्षा 2021 पर्यंत होती.” राणा भारतात 2011 मुंबईत हल्ला केल्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे. या हल्ल्यात जवळपास 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मुंबई हल्ल्यानंतर त्याला अमेरिकेतील लॉज एन्जेलिस येथे पकडण्यात आले होते.

पाकिस्तानी मूळ असलेल्या आणि सध्या कॅनडाचं नागरिकत्व घेतलेल्या तहव्वुर राणाला भारतात मुंबई हल्ल्याप्रकरणी (26/11) दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी 2013 मध्ये त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button