breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर माई ढोरे यांची घोषणा! पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सानूग्रह अनुदान 20 हजार रुपये !

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना येत्या दिवाळी सणाला प्रत्येकी ८.३३% प्रथा बोनस व 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आज (मंगळवारी दि २८ सप्टेंबर) दुपारी ०४.०० वाजता महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी संयुक्त बैठकीत केली.

यावेळी स्थायी समितीचे सभापती अँड नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, कामगार नेते गणेश भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सन २००५ पूर्वी दरवर्षी पिंपरी मनपा कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत होते करार केला जात नव्हता. सन २००५ साली महापालिका प्रशासननाबरोबर कर्मचारी महासंघाच्या वतीने बबन झिंझुर्डे यांनी करार करण्याची प्रथा सुरू केली.सन २०१६ साली प्रत्येक कर्मचाऱ्यास प्रथा • बोनस व सानुग्रह अनुदान १५०००रु देण्याचा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला. तो करार यावर्षी संपुष्टात आला. काल सांयकाळी महापालिका आयुक्त दालनात महापौर माई

ढोरे, स्थायी समितीचे सभापती अँड नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे व आयुक्त राजेश पाटील यांच्याबरोबर यावर्षीच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाबाबत मनपा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी यांच्या बरोबर बैठक घेण्यात आली.महासंघाच्या वतीने प्रत्येक कर्मचान्यास ३० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली. यावेळी महापौर माई ढोरे यांनी मध्यस्ती करत प्रत्येक कर्मचाऱ्यास २० हजार सानुग्रह अनुदान देण्याची सूचना केली. यावर आयुक्तांनी कर्मचारी महासंघाची मागणी व महापौर माई ढोरे यांची सूचना लक्षात घेता आयुक्त राजेश पाटील यांनी मनपा कर्मचाऱ्यास प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान पुढील पाच वर्षांसाठी देण्याचे मान्य केले. आज सांयकाळी ०४.०० वाजता महापौर दालनात आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे यांनी संयुक्त बैठकीत मनपा कर्मचाऱ्यास २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले

यावेळी स्थायी समिती सभापती अँड नितीन लांडगे, सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके, राहुल कलाटे इतर पदाधिकारी व पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे ●अध्यक्ष अंबर चिंचवडे, कामगार नेते गणेश भोसले, अविनाश तिकोने धुमाळ इत्यादींच्या उपस्थितीत बैठकीस उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button