breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

महासभा एकजुटीची : आंबेगावमध्ये कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे-पाटलांना घाम फुटणार!

शरद पवार यांच्या सभेला मोठा प्रतिसाद : देवदत्त निकम विधानसभा निवडणुकीचे उमेदवार? 

पुणे । विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार गट अशी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदार संघात शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. त्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वळसे-पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत सोपी नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र  पवार’ पक्षातर्फे पुणे जिल्हातील मंचर येथे आयोजित “महासभा एकजुटीची, साथ  अनुभवाची ताकद महाराष्ट्राची” या संकल्पेतून जाहीर सभा घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये आपला गट मजबूत करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. पण, ज्यांना शरद पवारांनी हाताच्या बोटाला धरुन राजकारणात आणले. मोठी पदे दिली. ते दिलीप वळसे-पाटील यांच्यासारखे परोपकारी नेते यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार गटानेही कंबर कसली आहे. 

दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव मतदार संघावर शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे. या मतदार संघात जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि भीमाशंकर सहकारी साखर कारख्याने अध्यक्ष देवदत्त निकम यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. मतदार संघामध्ये वळसे-पाटील यांच्याविरोधात असलेली ‘ॲन्टिइनकंपन्सी’, खासदार अमोल कोल्हे यांचा प्रभाव आणि निकम यांचा जनसंपर्क यामुळे आंबेगावमध्ये दिलीप वळसे-पाटील यांना ‘अवघड पेपर’ सोडवावा लागणार आहे. 

वास्तविक, देवदत्त निकम खरे तर दिलीप वळसे-पाटलांचे खंदे कार्यकर्ते होते. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत वळसे पाटलांनी त्यांना शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट देखील मिळवून दिले. २०१४ च्या निवडणुकीत देवदत्त यांचा शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी पराभव केला. परंतु या निवडणुकीत निकम यांना ३ लाख ४१ हजार ६०१ इतकी मते देखील मिळाली होती. बाजार समितीच्या निवडणुकीत निकम विरुद्ध वळसे-पाटील असे राजकीय संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि निकम यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

लाव रे तो व्हीडिओ… देवदत्त निकम ‘फायर मोड’वर! 

आंबेगावमध्ये झालेली सभा आणि त्याला मिळालेल प्रतिसाद पाहता देवदत्त निकम विधानसभा लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जाहीर सभेत निकम यांनी शरद पवार यांनी राजीनामा दिल्याच्या घटनेचा आणि त्यावरील वळसे-पाटील यांच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ लावला. त्यावेळी अश्रू ढाळणारे वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्याशी विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका निकम यांनी केली. त्यामुळे निकम आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे-पाटील यांना घाम फोडणार? असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button