चांदवड तालुक्यातील रापली गावात ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव संपन्न
![Yatra festival of village deity Khanderao Maharaj concluded in Rapli village of Chandwad taluka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220326-WA0003.jpg)
नाशिक | चांदवड तालुक्यातील रापली गाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. फाल्गुन पंचमीच्या शुभ मुहूर्तावर यंदा बारा गाड्या ओढण्याचा मान रापली गावातील ग्रामस्थ नकुल राजनोर यांना मिळाला होता. काशिनाथ बाबा ढोणे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या यात्रेचे यंदाचे ४४ वे वर्ष होते.
सलग सहा दिवस चाललेल्या या यात्रेत जागरण गोंधळ आणि बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. नवरदेवाच्या हस्ते मल्हार रथाचे पूजन करण्यात आल्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय असा गजर करत यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी गावातील आराध्य दैवताचे दर्शन घेऊन मानाचा अश्व मंदिराकडे नेण्यात आला. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोना निर्बंध हटवल्याने यंदा यात्रेत मोठा उत्साह दिसत होता.