Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही? राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut : समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर त्यांचे निलंबन देखील करण्यात आले. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. दरम्यान याच मुद्द्यावर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांना काही प्रश्न विचारले आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना वेगळा कायदा आहे का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सुधांशु त्रिवेदी यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्यावर देखील अबू आझमी यांच्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना अटक का झाली नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राऊतांनी अबू आझमी यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “अबू आझमी वर कारवाई झाली! एकदम कडक! मस्त! पण छत्रपती शिवाजी राजांना माफीवीर म्हणणाऱ्या या अतिशहाण्या भाजपा खासदारावर गुन्हा दाखल करून अटक का झाली नाही?,” असे राऊत म्हणाले आहेत.

“अजूनही वेळ गेलेली नाही! कोरटकर, सोलापुरकर आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्यांना देखील आझमीचा न्याय का नाही? शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपा वाल्यांना वेगळा कायदा आहे काय?,” असेही राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा –  ‘100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे दर 17 टक्क्यांनी कमी होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासदार संजय राऊत यांनी अन्सर इम्रान एसआर नावाच्या वापरकर्त्याने केलेली पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये या वापरकर्त्याने सुधांशू त्रिवेदी यांच्या त्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “जर औरंगजेबावर बोलल्याने अबू आसिम आझमी यांच्या आमदारकीवर तलवार लटकू शकते आणि त्यांच्या अटकेची चर्चा होऊ शकते तर त्याआधी सत्ताधारी भाजपाचे राजसभा सदस्य सुधांशु त्रिवेदी यांच्यावर खटला दाखल व्हावा.”

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले होते. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी औरंगजेबाचा वाद धार्मिक नव्हता तर राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचे वक्तव्य आझमी यांनी केले होते.

आझमी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी मंगळवारी आझमी यांच्यावर निलंबन आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते. त्यानंतर आझमी यांनीही आपले वक्तव्य मागे घेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी मागितली. तसेच औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा हेतू नव्हता आणि महापुरुषांचा अवमानही आपण केला नसल्याचा दावा आझमी यांनी केला.

दमम्यान संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील यांनी याबाबत मांडलेला प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आणि अबू आझमी यांचे बुधवारी अधिवेशनकाळापर्यंत निलंबन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button