आयपीएलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलीवूडचे कोणते कलाकार होणार सहभागी? जाणून घ्या

IPL 2025 Opening Ceremony : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चा हंगाम २२ मार्च रोजी कोलकाता येथे केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिल्या सामन्याने सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचे आयोजन ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता येथे केले जाणार आहे. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार परफॉर्मन्स करणार आहेत, ज्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहे? जाणून घेऊया.
याआधी उद्घाटन सोहळ्याबाबात एक मोठी बातमी समोर येत आहे. स्पोर्टस्टारच्या मते, यावेळी स्पर्धेच्या सर्व १३ ठिकाणी १३ उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. या काळात सलमान खान, वरुण धवन, कतरिना कैफ, तृप्ती डिमरी, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, जान्हवी कपूर, अरिजीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांसारखे मोठे स्टार धमाल करू शकतात. दिशा पटानीचे नाव अंतिम झाले आहे.
स्पर्धेचा पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होणार आहे. अशा परिस्थितीत, श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पटानी उद्घाटन सोहळ्याला येणार असल्याची बातमी आहे. आयपीएलचा उद्घाटन सोहळा एकापेक्षा जास्त शहरात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ च्या हंगामाच्या सुरुवातीला हा सोहळा सर्व ८ शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात अवकाळीसह गारपीट होणार, ‘या’ भागाला फटका बसण्याची शक्यता
अहवालानुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय या स्पर्धेला एक नवीन रंगसंगती देऊ इच्छित आहे. यामुळे, सर्व शहरांमध्ये उपस्थित असलेले लोक उद्घाटन समारंभाचा आनंद घेऊ शकतील. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांना प्रदर्शनाची संधी दिली जाईल.
केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी ३५ मिनिटांचा भव्य उद्घाटन सोहळ होईल, ज्यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी परफॉर्मन्स करण्याची शक्यता आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्घाटन सोहळाबद्दल माहिती देण्यास नकार देताना स्नेहाशिष म्हणाले, “हा एक मोठा सामना आहे, ज्यासाठी तिकिटांची मागणी खूप जास्त आहे. बऱ्याच काळानंतर ईडन गार्डन्सवर उद्घाटन सोहळा होत आहे.”