दिवाळीत खासगी ट्रॅव्हलने जास्त भाडे आकारल्यास कुठे कराल तक्रार?
![Where to complain if private travel charges high fare during Diwali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/private-travels-780x470.jpg)
पुणे : दिवाळीत हंगामात जादा भाडे आकारणी करु नका असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जादा भाडे आकारणी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने सन २०१८ रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत.
हेही वाचा – ‘रोड स्विपिंग मशीन’ची कार्यवाही तात्काळ सुरू करा!
दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले.