#War Against Corona: कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/8-8.jpg)
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गावकवाड यांनी घेतला होता. यामुळे विद्यापीठांच्या इतर परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
तसेच, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने यावर कोणतीही चर्चा केली नाही. परंतु, विद्यापीठांतील परिक्षा घ्यायची की नाही, यासाठी कुलगुरूंची समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत म्हणाले आहेत. एवढेच नव्हेतर, करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घेव्या याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.