ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर

मंदिर पाण्याखाली,शेतीचं नुकसान,वाहून गेली लोकं

महाराष्ट्र : वाशिमच्या मंगरूळपूर येथील एका नदीत तरूणाला स्टंटबाजी करणं चांगलंच महागात पडलं आहे. हा तरूण नदीत स्टंटबाजी करत असता वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या तरूणाचा शोध सुरू आहे. तर नांदेडमधील आसना नदीत एक तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने पुलावरून चालत जाण्याचं धाडस केलं. दरम्यान, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही व्यक्ती पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहे.

तर बीडच्या माजलगाव येथील गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली त्यामुळे गंगामसला येथील श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाईमधील रेना नदीला पूर आला आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबत वसमत नांदेडमधील उघडी नदीला पूर आला आहे. यामुळे आजू-बाजूच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button