Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवून सांगलीत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
सांगली – केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर सहा महिन्यात दुप्पट केल्याने सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने महागाईच्या विरोधात आज चूल पेटवून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून गोवऱ्या पाठविण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जिल्हा परिषदेसमोर चूल पेटवून महिलांनी निदर्शने करत परिसर दणाणून सोडला. सदरचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष डॉक्टर छाया जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजिस्टर पोस्टाने गोवऱ्या पाठविण्यात येणार आहेत. दरवाढीच्या विरोधात सतत आंदोलने केली जात आहेत पण केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणून हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे अध्यक्षा छाया जाधव यांनी सांगितले.





