Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा परवानगीसाठी उद्धव ठाकरेंची न्यायालयात धाव!
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर प्रतिवर्षीप्रमाणे दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोघांपैकी कोणाला परवानगी मिळणार आहे. याबाबत अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही. अशात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ठामपणे सांगत आहेत.
शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने जंगजंग पछाडले असून आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.





